*स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये परिवहन समिती सभा संपन्न*
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील परिवहन समिती सभा 28 जून 2025 रोजी संपन्न झाली.
सदर सभेस त.दा.वाहतूक विभागातील उपनिरीक्षक सौ. लता अंबरगी ,पोलीस नाईक श्री.मोहन पाटील,शालेय मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा, पर्यवेक्षिका,सौ.विजयमाला गायकवाड,पालक सदस्य श्री.विजय जाधव, शिक्षक प्रतिनिधी श्री.सिद्धेश्वर सोनवणे, वाहन कंत्राटदार श्री.हनुमंतराव मोरे, श्री. हनुमंत भेगडे, श्री.मोहन मराठे, श्री. राजू बनकर, श्री.प्रणित आगळे, श्री.मनोज शिंदे इत्यादी सदस्य उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे वाहतूक विभागातील उपनिरीक्षक सौ.लता अंबरगी व पोलीस नाईक श्री.मोहन पाटील यांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.
बस कंत्राटदार, वाहन चालक यांच्याकरिता विद्यार्थ्यांची ने आण करण्याकरिता आवश्यक तत्वे, सूचना, बसविषयक कागदपत्रे याविषयी बस चालकांना तळेगाव दाभाडे उपनिरीक्षक सौ.उमा अंबरगी यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाच्या खबरदारी विषयी बस चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे वक्तव्य पोलीस नाईक श्री.मोहन पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत 18 मार्च 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या विद्यार्थी वाहतूक नियमावलीबाबत शालेय मुख्याध्यापिका सौ.रेणू शर्मा यांनी बस चालकांना सूचित केले.