मावळ केसरी’च्या उत्कृष्ट नियोजनावर अजितदादांची मोहोर; प्रशांत व मेघाताई भागवत यांचे केले विशेष कौतुक

SHARE NOW

वडगाव मावळ:

मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या भव्य आणि यशस्वी नियोजनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या पाठीवर अजितदादांनी कौतुकाची थाप मारली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजय संपादन केलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादांनी मावळ केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा विशेष उल्लेख केला.

पैलवानांच्या ‘खुराका’चे विशेष कौतुक

नवलाख उंबरे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध होते, असे नमूद करत अजितदादांनी स्पर्धेत सहभागी पैलवानांना देण्यात आलेल्या सकस आहाराची (खुराकाची) मुक्तकंठाने प्रशंसा केली. खेळाडूंना उत्तम सुविधा पुरवल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

Advertisement

सामाजिक कार्याचा गौरव

यावेळी इंदोरी जिल्हा परिषद गटात प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक कामांचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव करत, पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस अजितदादांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

हनुमानाची मूर्ती देऊन सन्मान

अजितदादांनी केलेल्या कौतुकाचा स्वीकार करत, मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शक्तीची देवता हनुमानाची भव्य मूर्ती भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान केला.

या प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page