डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
राव कॉलनी विकास प्रतिष्ठान येथे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती बुद्धमय विचार मंच राव कॉलनी यांच्या वतीने उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक, आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. तळेगाव दाभाडे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
संस्थेचे अध्यक्ष अंकुश भाऊ भेगडे यांनी बाबासाहेबांचे विचार थोडक्यात व्यक्त करत असताना “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या बोधवाक्याला अनुसरून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित माहितीपट सांगण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा रमेश बनसोडे उपस्थित होते व बुद्धाचार्य अशोक काळे होते बुद्धमय विचार मंच मधील राजू जाधव संजय कडलक स्वप्निल साळवे वैशाली गंगावणे मंदाकिनी साळवे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गरुड यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील गंगावणे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता जय भीम! च्या घोषणांनी आणि बाबासाहेबांना मानवंदना देऊन करण्यात आली