*संगणका बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व लोटस कॉम्प्युटरच्या वतीने नेसावे ता.मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पाच संगणकाची एक लॅब तयार करून भेट देण्यात आली.
आजच्या या डिजिटल युगात शिक्षकांचे कार्य अधिकच महत्त्वाचे झाले आहे. विद्यार्थ्यांना योग्य माहिती देण्याबरोबरच त्यांना या माहितीच्या महासागरात संगणकाची योग्य देशा देणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी नेहमीच ग्रामीण भागातील शिक्षणाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. असे मत रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी चे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख तसेच जिल्हा झोनल चेअर पर्सन संदीप मगर यांनी संगणकाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख तसेच आर सीसी क्लबचे अध्यक्ष सुहास धस यांनी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे संगणक दिल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली याप्रसंगी सचिन कोळवणकर,अंतोष मालपोटे उपस्थित होते. प्रास्ताविक त्र्यंबक अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राजक्ता जाधव यांनी केले आभार रूपाली हरिहर यांनी मानले.