इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून सेजल मोईकरला 51 हजारचा धनादेश सुपूर्त.
तळेगाव दाभाडे :
दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत इंद्रायणी जिमची खेळाडू सेजल मोईकर हिने 76 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत मावळ तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे.
सेजल ही सुदवडी गावचे शेतकरी कुटुंबातील असून ती इंद्रायणी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. तिला या स्पर्धेसाठी इंद्रायणी जिमचे प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचे मार्गदर्शन लाभले. सेजलला आशियाई स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे यांनी सेजल मोईकरला इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून 51 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, कार्यवाह चंद्रकांतजी शेटे, सदस्या निरूपा कानिटकर मॅडम,सदस्य युवराज काकडे,प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यावेळेस उपस्थित होते.
याप्रसंगी सेजल मोईकरला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.