अलंकापुरीत मारुती मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई माऊली मंदिरासह आळंदी पंचक्रोशीत हनुमान जन्मोत्सव साजरा

SHARE NOW

आळंदी :

आळंदी येथील माऊली मंदिर, शनि मारुती मंदिर, काळा मारुती , श्री मारुती देवस्थान, श्री राम मंदिर, इंद्रायणी मारुती मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिरासह आळंदी पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या श्री हनुमान मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत हरिनाम जयघोषात तसेच वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवा, श्रींचा अभिषेख, पूजा, आरती, हनुमान चालीसा, प्रसाद वाटप, अन्नदान सेवा रुजू करीत भाविकांचे उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा झाला.

येथील विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळा तसेच पंचक्रोशीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे सोहळ्यात श्रीचे जीवन चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार, महाराज मंडळींची कीर्तन सेवा झाली. भाविक नागरिकांचे उपस्थितीत श्री हनुमान जन्मोत्सव हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी नियोजन केले. नवशिवशक्ती मित्र मंडळ, श्री हजेरी मारुती मंदिर, आळंदी ग्रामस्थ यांनी जन्मोत्सवास विशेष परिश्रम घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. यावेळी सुधाकर महाराज काटोले यांनी श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा रुजू केली. आळंदी ग्रामस्थांचे वतीने सुधाकर महाराज यांचा भव्य मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हजेरी मारुती मंदिरातील जन्मोत्सवा निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर भाविक , नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आळंदी माऊली मंदिर येथे परंपरेने बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी कीर्तन सेवा रुजू केली. काळा मारुती मंदिर येथे संतोष महाराज मोझे यांचे तर्फे शरद महाराज बंडगर यांनी कीर्तन सेवा दिली. येथे विलास वाघमारे, संकेत वाघमारे, विलास वाघमारे आणि व्यापारी युवक तरुण मंडळ यांनी नियोजन केले. भव्य मंडप व्यवस्था संकेत वाघमारे यांनी केली. इंद्रायणी मारुती मंदिर येथे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, इंद्रायणी मारुती मंदिर अध्यक्ष गणेश रहाणे यांचे प्रमुख उपस्थितीत जन्मोत्सव साजरा झाला. येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा देण्यात आल्याचे गणेश रहाणे यांनी सांगितले. शनि मारुति मंदिर येथे सोमनाथ वाघमारे यांनी जन्मोत्सवाचे परिश्रम पूर्वक नियोजन केले. भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. होती. हजेरी मारुती मंदिरात पुष्पसजावट लक्षवेधी ठरली. माउली मंदिरासह सर्व श्री हनुमान, श्री मारुती मंदिरांत श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. सेवकांनी कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था केली.

माऊली मंदिरातील प्रथांचे पालन करीत प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे हस्ते मारुती रायांची पूजा, अभिषेख झाला. परंपरेने माऊली मंदिरातील आरती सर्व मारुती मंदिरात हरिनाम गजरात आणण्यात आली. बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे वैभवी कीर्तन झाले. मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवा निमित श्रीना रुद्राभिषेक करण्यात आल्याचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. ह.भ.प वैराग्य मूर्ती स्व. जयराम महाराज भोसले यांच्या १७ व्या स्मृति दिना निमित्त समाधी पूजा, अभिषेक, महानैवेद्य १३ एप्रिल २०२५ रोजी होत आहे. या निमित्त हरिनाम गजरात सप्ताह माऊली मंदिरात सुरु होत असल्याचे बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी सांगितले. हजेरी मारुती मंदिरात आरती ग्रुप तर्फे हनुमान जन्मोत्सवा निमित्त प्रसाद वाटप करण्यात आला.

Advertisement

येथील माऊली मंदिर, शनि मारुती मंदिर, काळा मारुती , श्री मारुती देवस्थान, श्री राम मंदिर, इंद्रायणी मारुती मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिरासह आळंदी पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या श्री हनुमान मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत हरिनाम जयघोषात तसेच वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवा, श्रींचा अभिषेख, पूजा, आरती, हनुमान चालीसा, प्रसाद वाटप, अन्नदान सेवा रुजू करीत भाविकांचे उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा झाला.

येथील विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळा तसेच पंचक्रोशीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे सोहळ्यात श्रीचे जीवन चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार, महाराज मंडळींची कीर्तन सेवा झाली. भाविक नागरिकांचे उपस्थितीत श्री हनुमान जन्मोत्सव हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी नियोजन केले. नवशिवशक्ती मित्र मंडळ, श्री हजेरी मारुती मंदिर, आळंदी ग्रामस्थ यांनी जन्मोत्सवास विशेष परिश्रम घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. यावेळी सुधाकर महाराज काटोले यांनी श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा रुजू केली. आळंदी ग्रामस्थांचे वतीने सुधाकर महाराज यांचा भव्य मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हजेरी मारुती मंदिरातील जन्मोत्सवा निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर भाविक , नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आळंदी माऊली मंदिर येथे परंपरेने बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी कीर्तन सेवा रुजू केली. काळा मारुती मंदिर येथे संतोष महाराज मोझे यांचे तर्फे शरद महाराज बंडगर यांनी कीर्तन सेवा दिली. येथे विलास वाघमारे, संकेत वाघमारे, विलास वाघमारे आणि व्यापारी युवक तरुण मंडळ यांनी नियोजन केले. भव्य मंडप व्यवस्था संकेत वाघमारे यांनी केली. इंद्रायणी मारुती मंदिर येथे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, इंद्रायणी मारुती मंदिर अध्यक्ष गणेश रहाणे यांचे प्रमुख उपस्थितीत जन्मोत्सव साजरा झाला. येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा देण्यात आल्याचे गणेश रहाणे यांनी सांगितले. शनि मारुति मंदिर येथे सोमनाथ वाघमारे यांनी जन्मोत्सवाचे परिश्रम पूर्वक नियोजन केले. भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. होती. हजेरी मारुती मंदिरात पुष्पसजावट लक्षवेधी ठरली. माउली मंदिरासह सर्व श्री हनुमान, श्री मारुती मंदिरांत श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. सेवकांनी कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था केली.

माऊली मंदिरातील प्रथांचे पालन करीत प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे हस्ते मारुती रायांची पूजा, अभिषेख झाला. परंपरेने माऊली मंदिरातील आरती सर्व मारुती मंदिरात हरिनाम गजरात आणण्यात आली. बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे वैभवी कीर्तन झाले. मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवा निमित श्रीना रुद्राभिषेक करण्यात आल्याचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. ह.भ.प वैराग्य मूर्ती स्व. जयराम महाराज भोसले यांच्या १७ व्या स्मृति दिना निमित्त समाधी पूजा, अभिषेक, महानैवेद्य १३ एप्रिल २०२५ रोजी होत आहे. या निमित्त हरिनाम गजरात सप्ताह माऊली मंदिरात सुरु होत असल्याचे बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी सांगितले. हजेरी मारुती मंदिरात आरती ग्रुप तर्फे हनुमान जन्मोत्सवा निमित्त प्रसाद वाटप करण्यात आला.

SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page