पाण्यासाठी चावसर येथील महिलांचा मावळ पंचायत समितीवर मोर्चा

SHARE NOW

पवनानगर

मावळ तालुक्यातील अतिदुर्गम चावसर गावाला धरण उशाला असतांना देखील हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी मावळ पंचायत समितीवर मोर्चा काढला होता.यावेळी मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा चावसर गावातील पाणी पुरवठा योजनेचे गेल्या पाच महिन्यापासून विस्कळीत झाल्याने गावाला गेली पाच महिने पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी येथील नागरिकांना सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था चावसर गावातील नागरिकांची झाल्याने महिलांनी मावळ पंचायत समितीवर मोर्चा काढला होता.यावेळी ग्रामसेवक व पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.केवरे चावसर ग्रामपंचायत असून,चावसर गावाला हाकेच्या अंतरावर असलेल्या पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे . गेल्या दिडवर्षभरापूर्वी चावसर गावात जलजिवन मिशन योजनेंतुन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे .मात्र ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली नाही. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाच्या हाकेच्या अंतरावर पवनाधरण असतांना देखील गावाला सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नगरिकांमध्ये या योजने विषयी संभ्रम निर्माण झाला आहे.या गंभीर समस्याकडे अधिकारी मात्र एकमेकांच्या अंगावर ढकलत असल्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. याची दखल घेऊन गावाला सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा,येत्या आठवडाभरात पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु न झाल्यास मावळ पंचायत समिती वर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची मागणी गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी चावसर गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

Advertisement

गावातील पाणी पुरवठा करणारा कर्मचारी हा ग्रामसेवक,प्रशासक व ग्रामस्थांचे कोणत्याही प्रकारचे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आयकत नसल्यामुळे तो गावातील मोठ मोठ्या बंगले फार्महाऊस यांना पाण्याची अनाधिकृत विक्री करत असून गावातील ग्रामस्थांना पाणी सोडत नाही. ग्रामस्थांनी तक्रारार केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन. पाणी पुरवठा करण्या बाबत टाळाटाळ करत असल्याच्या आरोपावरून येत्या दोन दिवसांत संबधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करुन येत्या दोन दिवसांत ग्रामसभेत ठराव घेऊन गरजू क्रियाशील कर्मचारी निवडण्याचे आदेश ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहे.

 

प्रतिक्रिया

कुलदिप प्रधान

गटविकास अधिकारी मावळ पंचायत समिती

याबाबत ग्रामसेवक व प्रशासक यांनी पाणी पुरवठा करत असलेल्या कर्मचाऱ्यांला निलंबित करण्याचे आदेश दिले असून येत्या चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यात येईल.

 

…….

लिलाबाई भागू गोणते

महिला ग्रामस्थ

आमची वय आता सत्तर वर्षे झाली तरी आम्हाला पाणी नाही. दोन दोन तास लागतो एक हंडा भरुन आणायला आम्ही काय करायच.आमच्या घरातील माणसांना पाणी लागतेच आमची मुक्या जनावरांना पाण्यासाठी वणवण फिरवा लागतय.

 

लक्ष्मीबाई गोणते

महिला ग्रामस्थ

आमच्या जागा धरणात गेल्या आणि आम्हाला पाणी पेयला मिळत नाही.आमच्या गावात पुढारी फक्त मत मागायला येतात चार महिने झाले पाणी नाही पुढारी झोपले आहे का.

 

संतोष बोंद्रे

ग्रामसेवक केवरे चावसर ग्रुप ग्रामपंचायत

गटविकास अधिकारी साहेबांनी सुचना केल्याप्रमाणे पाणी पुरवठा करणाऱ्यां कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येणार असुन येत्या चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु करुन घेण्याची जबाबदारी माझ्या वर सोपवल्याप्रमाणे ती मी पुर्ण करतो.

 

 

मारुती मोहन गोणते

ग्रामस्थ चावसर

गेल्या सहा महिन्यापूर्वी असेच आंदोलन पंचायत समिती समोर केले होते. पंरतु ग्रामसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी हे उडाउडावीची उत्तरे देत असतात पंरतु खाजगी बंगले फार्महाऊस यांना रात्रीच्या वेळी कनेक्शन देऊन पाणी पुरवठा केला जातो.पंरतु ग्रामस्थांना मोटारीत बिघाड झाल्याचे सांगत असतात. ग्रामसेवक व कर्मचारी हे बंगले फार्महाऊस यांच्या कडे हात मिळवणी करुन त्यांना पाणी रात्रीच्या वेळी देत असतात पंरतु ग्रामस्थांना दोन दोन किलोमीटर अंतरावर जाऊन हंडाभर पाणी आणावे लागत आहे.गटविकास अधिकारी मावळ यांनी दिलेल्या आश्वासने आम्ही आंदोलन स्थगित करत असून कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसांत पंचायत समिती समोर अमरण उपोषण करणार आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page