आळंदीत आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार हरिनाम गजरात प्रदान

SHARE NOW

आळंदी (प्रतिनिधी ) : तीर्थक्षेत्र आळंदीतील आदर्श माता स्व. पार्वतीबाई उर्फ जीजी देवराम काळे यांचे सहाव्या पुण्यतिथी निमित्त आदर्श माता रमाबाई किसन महाराज साखरे ( आळंदी ) यांना माई माऊली पुरस्कार हरिनाम गजरात प्रधान करीत विविध धार्मिक कार्यक्रमात पालखी सोहळयातील १५ दिंडीना शिधा वाटप, प्रवचन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद वाटप करण्यात आले. स्व. जीजी पार्वतीबाई देवराम काळे यांची सहावी पुण्यतिथी सामाजिक बांधिलकीतून हरिनाम गजरात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात झाली. या निमित्त आदर्श मातेची शिकवण डोळ्यासमोर ठेवत माई माऊली पुरस्कार रमाबाई महाराज साखरे यांना प्रदान करण्यात आला.

या हृदयस्पर्शी सोहळ्यास आमदार बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, जगदीश मुळीक, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, अँड. राजेंद्र उमाप, भाजपचे नेते राम गावडे, श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे मार्गदर्शक प्रकाश तात्या काळे, संयोजक अजय काळे, अश्विनी काळे, देवराज काळे, सुजल काळे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, खजिनदार दीपक पाटील, सदस्य अशोक कुऱ्हाडे, इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारी, नाना लोंढे, भागवत महाराज साळुंखे, महेश काकडे,दीपक काळे, महेश काकडे, तानाजी चौधरी, विजय गुळवे, योगेश मुळीक, निवृत्ती महाराज गलांडे, विष्णू गलांडे, बाळासाहेब पाडळे, अशोक घुले, किसन गलांडे, चंद्रकांत चव्हाण, श्रीधर सरनाईक, वाबळे महाराज, किशोर भोगावडे, सोपान काळे, धनाजी काळे, भाऊसाहेब पाटील, विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील, अर्जुन मेदनकर, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहिदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान चे विश्वस्त पदी अर्जुन मेदनकर यांची निवड झाल्या बद्दल श्रीमती रमाबाई साखरे महाराज यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या निमित्त हरिपाठ सेवेत लहू महाराज भारती, मुरली महाराज गावडे, महादेव महाराज बरसाले यांनी सेवा रुजू केली. पुण्यस्मरण दिना निमित्त प्रवचकार ह. भ. प. डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी हृदयस्पर्शी वाणीतून प्रवचन सेवा रुजू केली. यावेळी त्यांनी आई विषयी मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून महत्व विशद करीत आई विषयी सर्वांचे मनात प्रेम भाव कसा वाढेल, आई, वडील, गुरुजन यांचे विषयी आदराची आणि सेवा भावाची भावना कशी निर्माण होईल आणि कायम टिकून राहावी यासाठी डॉ. गेठे महाराज यांनी आपल्या प्रवचनातून संतांचे कार्याचे तसेच स्व. जिजीआई यांचे प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. त्यांचे सेवा कार्य आजही श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे आणि परिवार पुढे वारसा जपत आहे. सामाजिक बांधिलकी देखील जपत अध्यात्मिक कार्यात सक्रिय राहून आपले योगदान देत आहेत. ते इतरांना निश्चित प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

संत साहित्याचे कार्यात प्रचार, प्रसार आणि राज्या परिसरात नव्हे तर देश परदेशात आध्यात्मिक जनजागृती कीर्तन, प्रवचनाचे, व्याख्यानांस प्रोत्साहन आणि साखरे परिवारातून मोठे योगदान देण्यास परिश्रम पूर्वक कार्यरत राहिलेल्या आदर्श व्यक्तिमत्व माता रमाबाई साखरे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक कीर्तनकार स्व. किसन महाराज साखरे यांचे पत्नी आणि युवा राष्टीय कीर्तनकार यशोधन महाराज साखरे, चिदंबरेश्वर महाराज साखरे यांचे मातोश्री आदर्श माता रमाबाई किसन महाराज साखरे ( आळंदी ) यांना माई माऊली पुरस्कार देऊन हरिनाम गजरात काळेवाडी ( आळंदी ) येथे मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

जिजींनी सुचविलेल्या पालखी सोहळ्यातील १५ दिंडींना शिधावाटप करण्यात आले. यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान दिंडी, सद्गुरु प्रेमानंद बाबा दिंडी, ज्ञानोबा तुकाराम महाराज दिंडी आदी दिंडी यांचा समावेश होता. कार्यक्रमचे संयोजन ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे मार्गदर्शक प्रकाश तात्या काळे, अजय काळे, अश्विनी काळे, देवराज काळे, सुजल काळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page