जागतिक मधुमेह दिन निमित्त व्याख्यान मोफत व रक्त शर्करा तपासणी
तळेगाव दाभाडे :
माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील औषध वैद्यक शास्त्र विभाग आणि जन औषध शास्त्र विभाग यांच्या वतीने गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जागतिक मधुमेह दिना निमित्त डॉ.मंदार चंद्रचूड व डॉ. अमित येळे यांचे मधुमेह या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी मधुमेह तज्ञ डॉ. अमित येळे यांनी भारतातील मधुमेह आजाराचे वाढते प्रमाण व मधुमेह औषधांवरील संशोधन यावर विस्तृत व्याख्यान दिले तसेच डॉ. मंदार चंद्रचूड यांनी मधुमेहावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर सविस्तर व्याख्यान दिले.
तसेच दिनांक १४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनाच्या दिवशी औषध वैद्यक शास्त्र विभागातर्फे रुग्णांची मोफत रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. तसेच मधुमेह उपयुक्त पाककला स्पर्धा व मधुमेहावरील घोषवाक्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेला कॉलेज व हॉस्पटलच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
वैद्यकीय महाविद्यालयातील औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मधु बनसोडे, जन औषध शास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजीव चिंचोलीकर यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, प्राचार्या डॉ. दीप नायर, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी यांचे मार्गदर्शन लाभले.
जनसंपर्क व प्रसिद्धी विभाग एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भासतग्रा रुग्णालय तळेगाव दाभाडे






