जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची बिनविरोध निवड
वडगाव मावळ दि.3 (प्रतिनिधी) जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या
निवडणुकीत स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच कल्पना काकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच नागेश ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या वेळी उपसरपंच पदासाठी स्नेहल ओव्हाळ यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाला होता. त्यामुळे ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच नागेश ओव्हाळ यांनी जाहीर केले. ग्रामसेविका कल्याणी लोखंडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले.
या प्रसंगी माजी आदर्श सरपंच संतोष जांभुळकर, माजी उपसरपंच एकनाथ गाडे, कुंदा खांदवे, ग्रामपंचायतीच्या सदस्या तृप्ती जांभूळकर, रुपाली गायकवाड, रखाबाई भोईर, अमित ओव्हाळ उपस्थित होते. सरपंच नागेश ओव्हाळ, मा.सरपंच अंकुश काकरे, तानाजी खांदवे, मानाजी खांदवे, मा.सदस्य चंद्रकांत ओव्हाळ, भास्कर ओव्हाळ, बाळासाहेब काकरे,माजी सरपंच अश्विनी अमोल ओव्हाळ,बाळकृष्ण काकरे, अमोल पोटवडे, अमोल ओव्हाळ, प्रमोद पोटवडे, अनिल काकरे, महेंद्र ओव्हाळ,माणिक काकरे,शैलेश ओव्हाळ,प्रल्हाद जांभूळकर, सोमनाथ जांभूळकर,भानुदास जांभूळकर,अमोल काकरे, अविनाश ओव्हाळ, सचिन ओव्हाळ, सेवक ओव्हाळ, गणेश ओव्हाळ,बबन ओव्हाळ,धीरज गायकवाड,मयूर काकरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व सदस्यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच स्नेहल ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला.नवनियुक्त उप सरपंच स्नेहल ओव्हाळ म्हणाल्या जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत अंतर्गत रस्ते, पथदिवे, सांडपाण्याची गटारे, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार तसेच ग्रामपंचायत ला केंद्र व राज्य पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार. बिनविरोध निवड केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार. महिला बचत गटांना प्राधान्य देणार.