बाल विकास विद्यालयात श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
तळेगाव दाभाडे.
स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या, बालविकास .विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेटे, सचिव श्री. किशोर राजस , खजिनदार श्री. शिवाजी आगळे, यांच्या हस्ते श्री .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच संस्थेच्या मान्यवरांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी उजाळा दिला.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा, शिवरायगीत ,पाळणा,भाषण तसेच तलवार,लाठीकाठी, किल्ले , दानपट्टा,शिवमुद्रा , अशा शिवकालीन वस्तूंचे व पुस्तकांचे प्रदर्शन भरून विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेटे सचिव श्री. किशोर राजस, खजिनदार श्री. शिवाजीराव आगळे, मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे, कार्यालयीन अधीक्षक सौ . सुजाता कुलकर्णी सर्व विभाग पर्यवेक्षक ,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती शेरीगार आभार सौ मौशमी भट्टाचार्य यांनी केले. श्रीमती श्रद्धा तांबडे, सौ वैशाली पोफळे यांनी शिवगर्जना करून उपस्थित त्यांची मने जिंकले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.