छत्रपती शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – यादवेंद्र खळदे
छत्रपती शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष श्री यादवेंद्र खळदे यांनी गोल्डन रनिंग ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या कोराईगड ते तळेगाव दाभाडे शिवज्योत स्वागत प्रसंगी केले.
रयतेच्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी वागले पाहिजे व एक आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे असेही श्री यादवेंद्र खळदे यांनी सांगितले.
याप्रसंगी रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्वर्गीय बाळासाहेब लोहकरे, स्वर्गीय विनोद मेहता, श्री प्रताप दाभाडे यांच्या नेतृत्वात आम्ही सुद्धा तळेगाव दाभाडे शहरात शिवज्योत मंडळ यांच्या माध्यमातून शिवज्योत आणत होतो.
याची आठवण आज या निमित्ताने झाली.
सिंधुदुर्ग ते तळेगाव दाभाडे अशी शिवज्योत आणण्याचा विक्रम शिवज्योत मंडळाने केला होता अशी सुद्धा आठवण त्यांनी करून दिली.
कोराईगड येथील किल्ल्याची संपूर्ण माहिती सुरज जाट यांनी विस्तृतपणे दिली.
शिवज्योत घेऊन पळणाऱ्या शिवभक्ता बरोबर रस्ता सुरक्षे साठी श्री साठे, अरुण पाटील, अतुल शेटे व आकाश या 4 जणांनी संपूर्ण मार्गा वर सायकल चालवून सुरक्षा प्रदान केली.
तळेगाव दाभाडे शहरातील लिंब फाटा या ठिकाणाहून शिवज्योतीच्या मिरवणुकीची सुरुवात होऊन मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, डोळसनाथ मंदिर, गणपती चौक, बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक संपन्न झाली.
मिरवणुकीमध्ये मुली व महिलांची विशेष उपस्थिती होती.
बाल शिवाजी व जिजाऊ माता सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
तळेगाव दाभाडे शहरातील श्री शिवाजी टॉकीज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना वंदन करण्यात आले.
शिवज्योतीचे स्वागत श्री यादवेंद्र खळदे, श्री किरण ओसवाल, श्री जतीन शहा यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन विशाल खळदे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन दीपक फल्ले, जे पी प्रकाश,प्रदीप मुंगसे, प्रशांत ताये,अविनाश कुरणे, मंदार पटवर्धन, दिनेश चिखले,भरत खेडकर, संजय बाविस्कर, सुजाता देव, संपदा कुरणे,साक्षी चिकोडे, मंगेश मारवाडी, राघवेंद्र, बाळु चव्हाण,अमोल हिंगे,मयूर माने,के डी सावंत,योगेश रहाळकर व सर्व गोल्डन रनिंग ग्रुप चे सदस्य यांनी केले.