पुणे शहर अध्यक्षपदी महेश भोईबार यांची नियुक्ती…
कोंढवा पुणे :
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी महेश भोईबार यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी महेश भोईबार यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अमितसाहेब ठाकरे यांनी प्रदान केले.
सदर नियुक्ती पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, राज्य सचिव आशिष साबळे पाटील आणि राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांच्या सहमतीने करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून महेश भोईबार यांनी विद्यार्थी हिताचे विविध प्रश्न त्यांनी सोडवले असून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी ते कायम कटिबद्ध असतात. त्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण, मोर्चे देखील त्यांनी काढले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी काळात तरुणांमध्ये विद्यार्थी सेनेच्या कार्याचा प्रसार करणार असून पक्ष संघटन व पक्ष वाढीसाठी प्रचंड महिन्यात घेणार असल्याचे नवनियुक्त विद्यार्थी सेना पुणे शहर अध्यक्ष महेश भोईबार यांनी नमूद केले.