सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.ज्योती परिहार यांची इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात भेट
दि.१९.तळेगाव प्रतिनिधी : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.ज्योती परिहार यांनी इयत्ता ११ वी ऑनलाइन
प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात माहिती घेत सुनियोजित प्रवेश प्रक्रियेबद्दल तसेच इतर कार्यालयांनी कामकाजाचा आढावा घेत विद्यालयाचे कौतुक केले.
याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे तसेच यशोदा महादेव काकडे काॅलेज ऑफ
इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ.साहेबराव पाटील उपप्राचार्य संदिप भोसले पर्यवेक्षिका उज्वला दिसले विज्ञान विभाग प्रमुख उत्तम खाडप कला विभाग प्रमुख केशव जाधव वाणिज्य विभागप्रमुख विना भेगडे यांनी डॉ.ज्योती परिहार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






