*तळेगाव येथे बुध्द पौर्णिमा उत्सव साजरा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थान येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त स्वर वंदन बुद्धाला(बुध्द भीम गीतांजली) धम्म पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी गजलकार आणि गायक अशोक गायकवाड यांचा धम्म पहाट कार्यक्रम सादर झाला.यावेळी आनंदा वाघमारे परिवारांकडून रु.२००००/-समितीस धम्मदान म्हणून देण्यात आले ते अध्यक्ष रंजना भोसले यांनी स्वीकारले.यावेळी सचिव किसन थूल,एल.डी.कांबळे,रुपेश घोडेस्वार उपस्थित होते रोहीणी ओहाळ यांनी खीरदान केले.