अंशु पाठक महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
पिंपरी चिंचवड :

मानवाधिकार आणि गुन्हेगारी संरक्षण असोसिएशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६” तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते अंशु पाठक यांना प्रदान करण्यात आला आहे. मानवाधिकार संरक्षण, गुन्हेपीडितांना मदत आणि समाजात न्याय प्रस्थापित करण्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. महात्मा जोतीराव फुले यांच्या 199व्या जयंतीदिनी रावेत येथे झालेल्या समारंभात पाठक यांच्या सहचारिणी यांनी पुरस्कार स्वीकारला.
मुळचे दरभंगा येथील काली स्थान, शिवाजीनगरचे रहिवासी असलेले अंशु पाठक सध्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असून सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी मानवाधिकारांचे रक्षण, गुन्ह्यांमुळे पीडित झालेल्या लोकांना न्याय मिळवून देणे आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक गरजू आणि पीडितांना न्याय मिळाला आहे. विशेषतः त्यांनी दुर्बल घटक, शोषित आणि वंचित वर्गांचा आवाज बनून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परप्रांतीय आणि महाराष्ट्रीयन यांच्यात सामाजिक एकोपा आणि सलोखा राखण्याकामी त्यांनी नेटाने प्रयत्न केले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंशु पाठक यांचे अभिनंदन केले आहे. फोटो






