स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

 

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाची विशेष थीम “नवरस” अशी असून, त्यातून विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीत व अभिनयाद्वारे भारतीय संस्कृतीतील नऊ रसांचे प्रभावी सादरीकरण केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर नाईक (प्रसिद्ध मराठी अभिनेते) उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्री. शैल्य मेंथे सर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सचिव श्री. संदीप मगर सर, ॲड. श्रुती नाईक मॅडम हे मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष खांडगे सर, अध्यक्ष श्री. दादासाहेब उऱ्हे सर, कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे सर, सचिव श्री. मिलिंदजी शेलार सर, शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम, खजिनदार श्री. सुदामजी दाभाडे सर, उपाध्यक्ष सौ. जयश्रीताई जोशी मॅडम, सल्लागार शबनम खान मॅडम, कुसुमताई वाळुंजकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा मॅडम, पर्यवेक्षक श्री. सिद्धेश्वर सोनवणे सर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा योग्य सन्मान व सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर सरस्वती स्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले. माध्यमिक विभागाचा वार्षिक अहवाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा मॅडम यांनी सादर केला. या अहवालात शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, स्पर्धांमधील यश तसेच भविष्यातील शैक्षणिक उद्दिष्टांची सविस्तर माहिती देण्यात आली.

 

प्रमुख पाहुणे दिगंबर नाईक सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये लपलेली कला ओळखून ती आत्मविश्वासाने सादर करण्याचे महत्त्व विशद केले. शिक्षणाबरोबरच कला, संस्कृती व मूल्यांची जोपासना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

श्री. शैल्य मेंथे सर यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचे कौतुक केले. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या शिवस्मारकाच्या संकल्पना, देखणेपणा व प्रेरणादायी संदेशाचे विशेष कौतुक करत, असे स्मारक विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य व मूल्यांची जाणीव निर्माण करते, असे त्यांनी नमूद केले.

श्री. संदीप मगर सर यांनी प्रभावी मनोगतातून शाळेतील शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष खांडगे सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. “विद्यार्थ्यांमधील दडलेली गुणवत्ता ओळखून ती विकसित करणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांचे व्यक्तिमत्त्व घडते,” असे प्रेरणादायी विचार व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एकूणच नवरस या संकल्पनेवर आधारित माध्यमिक विभागाचे हे वार्षिक स्नेहसंमेलन प्रेरणादायी, उत्साहवर्धक व संस्मरणीय ठरले

याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले. सर्वोत्तम खेळाडू म्हणून इयत्ता दहावीतील वरद जाधव या विद्यार्थ्याला पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी हा मानाचा पुरस्कार सिया उमरिया व शिस्तप्रिय विद्यार्थी विवेक ढेंगळे या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय इयत्ता आठवीतील मानसी राऊत या विद्यार्थिनीला शौर्य शलाका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. “नवरस” या थीमनुसार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य, गीत व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री. सचिन झेंडे व सौ. प्रतिभा शिरसाठ, तसेच शाळेचे विद्यार्थी कु. सिया उमरिया व विवेक ढेंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. सिद्धेश्वर सोनवणे सर यांनी केले.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे सर ,शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे मॅडम, कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे सर, सचिव श्री मिलिंद शेलार सर यांनी या कार्यक्रमाची कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page