मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न..

SHARE NOW

शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत मावळ तालुक्यात चालू असलेल्या अनेक चुकीच्या कामाबाबतीत तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र महाविकास आघाडीतील मिञ पक्ष “काँग्रेस – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब, आर पी आय निकाळजे गट” पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली.

मावळ तालुक्यातील नागरिकांचे न सुटणारे विविध प्रश्न, शेतकऱ्याची व्यथा यावर एकत्रित आंदोलन उभारणे, महिलांचे प्रश्न सोडवणे, विविध शासकीय योजना, चालू असलेला कामातील भ्रष्टाचार, प्रशासनातील अरेरावीपणा अशा महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Advertisement

२७ ते ३० डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा मध्ये सहभागी होण्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना या मुजोर सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन सर्व प्रमुख पदाधिकारी माजी मंत्री मदन बाफना साहेब, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास आप्पा काकडे, दिलीप ढमाले, शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवक काँग्रेस मा तालुकाध्यक्ष गणेश काजळे, मा. नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, शादानभाभी चौधरी, जयश्री पवार, पुष्पा भोकसे, किसन कदम, राजेश वाघोले, सुनिल शिंदे, मदन शेडगे, शांताराम भोते, मिकी कोचर, बारकू ढोरे, पांडुरंग दाभाडे, रोहिदास वाळुंज, संभाजी राक्षे, सुधाकर वाघमारे, गफूरभाई शेख, मधुकर कंद, नासिर शेख, मारुती आडकर, सहादू आरडे, रमेश घोजगे, योगेश चोपडे, अक्षय मुऱ्हे, शंकर मोढवे, नवनाथ केदारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. काँ. पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, प्रास्ताविक मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, स्वागत काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, आभार रा. काँ. युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले.

यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page