12वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत मुलींची बाजी विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे 94.83% गुण मिळवून प्रथम
तळेगाव दाभाडे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2024-2025 रोजी घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली.
इंद्रायणी महाविद्यालयच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशावर आपले नाव कोरले आहे. विज्ञान शाखेचा निकाल 98.60%
वाणिज्य शाखेचा निकाल 89% इतका लागला असून कला शाखेचा निकाल हा 73.33% इतका लागला आहे.तंत्रशिक्षण शाखेचा निकाल 97.67% लागला आहे.
विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे या विध्यार्थिनीने 94.83% इतके गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकवला असून.
वाणिज्य शाखेतून जाधव श्रुतिका विकास या विद्यार्थिनीने 90.5% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.
कला शाखेतून बोरे कुंदन संदीप या विद्यार्थ्याने 86.17 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे
तंत्रशिक्षण विभागातून होटकर विनायक मल्लिकनाथ या विद्यार्थ्यांनी 76.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
इंद्रायणी विद्यालयाचा शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे
*विज्ञान शाखा*
1)मिताली संजय फडतरे -94.83%
2)उन्नती राजेश ठाकूर-92.83%
3)आकांक्षा पोपट दाभाडे-89.50%
*वाणिज्य शाखा*
1) जाधव श्रुतिका विकास-90.5%
2)गोपाळे श्रुती प्रकाश-88%
2)काशीद कृष्णराज धनंजय-88%
3)गरुड मयुरा अमोल -84.17%
*कला शाखा*
1)बोरे कुंदन संदीप-86.17%
2)चिलप मयुरी निलेश-77.67%
3)वाघमारे कोमल राजेभाऊ-75.33%
*तंत्रशिक्षण*
1)होटकर विनायक मल्लिकनाथ-76.33%
2)माळी अथर्व अप्पासाहेब-67.83%
3)अंकुशी प्रदीप प्रकाश-66.83%
तंत्रशिक्षण विभागाचा एकून निकाल 97.67% लागला आहे
विशेष प्राविण्यासह प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उप प्राचार्य प्रा. संदीप भोसले व सर्व संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या