*आर्यन दाभाडे विद्यार्थ्याची राज्यस्तरावर शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड*
तळेगाव दाभाडे :
Advertisement
तळेगाव दाभाडे, मस्करनेस कॉलनी येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मधील आर्यन विक्रम दाभाडे इयत्ता ८ वी या विद्यार्थ्याची जिल्हास्तरावर उत्तम कामगिरी. जिल्हा क्रीडा कुस्ती शालेय स्पर्धा ग्रीको रोमन १७ वर्षीय मुले ७१ किलो वजन गटात या विद्यार्थ्याने यश संपादन केले असून त्याची निवड पुणे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. हर्षल मुळे क्रीडा शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे,सचिव दत्तात्रय नाटक, मुख्याध्यापिका रंजीता थंपी व सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक केले व त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






