डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅड रिसर्च आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,कृष्णराव भेगड़े इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅड रिसर्च चे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, प्रा . जी एस शिंदे आणि श्री. गोरख काकडे संस्थेचे मुख्य कीडासमन्वयक यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि संजय आरोटे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व महाविद्यालय देत असलेल्या विविध खेळाच्या सुविधा व प्रशस्त क्रीडांगण यांचा विद्यार्थी व खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त विद्यापीठ लोणेरे रायगड दरवर्षी अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे उत्साहात आयोजन केले जाते. यावर्षी स्पर्धेचे आयोजन कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकत एज्युकेशन अॅड रिसर्च महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. यामध्ये पुणे विभागातील सहा जिल्ह्यांमधून 100 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी श्री अजय तरडे, श्री उस्मान शेख, श्री दिवेकर पंडित आणि श्री सम्यक बनसोडे यांनी पंच म्हणून काम केले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड चे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे तसेच मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजीराव कराड, श्री बालाजी पुलचवाड आणि सिद्धेश जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. योगेश झांबरे, प्रा., अश्पाक मुलानी यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदासजी काकडे, कार्यवाह मा. श्री. चंद्रकांत शेटे, सदस्या व
मार्गदर्शिका सौ. निरुपा कानिटकर, तसेच इतर विश्वस्त मंडळ आदींनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.