संगीता पाटील यांना अखेर मिळाला न्याय.. वडिलोपार्जित जमीन मिळकतीत मिळाला हक्क.. ऍडवोकेट विजय ललवानी यांचा युक्तिवाद सफल..
पुणे
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
संगीता शिवाजी काटे (लग्नानंतरचे नाव) संगीता मल्हारी गायकवाड (लग्नापुवीचे नाव) हिच्या वडिलोपार्जीत जमिन मिळकती होत्या. सदर वडिलोपार्जीत जमिन मिळकतीमध्ये संगिता काटे हिचा 1/5 कायदेशीर अविभक्त हिस्सा होता. सदर संगिता काटे हिने वडिलोपार्जीत जमिन मिळकतीमध्ये मामांकडे तिच्या हिश्याचे वाटप करून मागितले व कायदेशीर हिस्सा मागितला. परंतु मामांनी १/५ हिश्याचे वडिलोपार्जीत जमिन मिळकतीचे वाटप करून देण्याचे नाकारले. तद्नंतर संगीता काटे यांनी तज्ञ विधीतज्ञ अॅड. विजय एच. ललवाणी यांच्या कायदेशीर सल्ल्यानुसार जमिन मिळकतीमध्ये वाटपासाठी व इतर कारणांसाठी दिवाणी न्यायालय, पुणे येथे मामाच्या विरूद्ध दावा दाखल करण्यात आला.
सदर दावा दाखल झाल्यानंतर मे. न्यायालयाने कायदेशीरपणे नोटिस पाठवुन मामाचा जबाब मागितला. परंतु मामाने बहिण व तद्नंतर भाची असल्याचे नाकारले व १/५ हिस्सा देण्यासाठी भाचीस प्रतिसाद दिला नाही.
संगीता काटे हिने आपली आई अनिता यांच्या मृत्यू नन्तर आपल्या मामाकडे मिळकती मध्ये हिस्सा मागितला होता परंतु त्यांनी त्यास नकार दिला होता. अनिता काटे हिला दोन भाऊ होते. परंतु अनिता काटे हिचे वडिलांच्या अगोदरच निधन झाले होते. तद्नंतर संगिता काटे हिने मामांकडे रितसरपणे हिस्सा मागितला. परंतु मामांनी संगिता काटे हिला १/५ हिस्सा देण्याचे स्पष्टपणे नाकारले व वाटप करण्याचेही नाकारले होते .
तद्नंतर संगिता काटे हिने रितसरपणे दिवाणी न्यायालय, पुणे यांच्याकडे वाटपासाठी दावा दाखल केला. तद्नंतर मामा व भाची यांच्यामध्ये एकमताने चर्चा होऊन संगिता काटे हिच्यासोबत तडजोड करण्याचे मान्य केले. तद्नंतर संगीता काटे व मामा यांनी संमतीने मे. न्यायालयात तडजोड दाखल केली.
तद्नंतर मे. दिवाणी न्यायालय, पुणे (मे. श्री. यु.पी. देवर्षी कोर्ट, पुणे) यांनी युक्तीवाद ऐकुन संगिता पाटील हिची दिनांक ३१/१०/२०२५ रोजी तडजोड पुरशीस मान्य केली व अखेर भाचीला न्याय देण्यास विधितज्ञ अॅड. विजय एच. ललवाणी यांना अखेर यश आले.
आपल्याला मिळालेले हे यश केवल माझ्यासोबत ठामपणे उभे राहिलेले विधितज्ञ अॅड. विजय एच. ललवाणी यांच्यामुळे मिळाले असल्याची माहिती संगीता काटे यांनी दिली.






