सुदुंबरे येथे फौजदारी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
तळेगाव दाभाडे: मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांचे ७ कलमी कार्यक्रमानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाणे हद्दीतील सुदुंबरे येथे मंगळवारी (दि.२८)फौजदारी कायद्याचे प्रशिक्षण अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी सरपंच मंगल गाडे ,उपसरपंच बापूसाहेब बोरकर, ग्रामपंचायत सदस्य अलका गाडे, बाळासाहेब गाडे, नाथा गाडे यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड.विजय मखामले, ॲड.प्राजक्ता तारू , ॲड. सागर शेटे यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे. कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिली.