*तळेगाव परिसरात तुफान पाऊस*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे परिसरात गुरुवारी(दि.१६) सायंकाळी ५वा.पासुन विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात तुफान पाऊस पडत आहे.सदर पाऊस माळवाडी, इंदोरी,सोमाटणे,धामणे,चांदखेड उर्से आदी ठिकाणी पडत आहे.वीज गायब झाली आहे.दिवसभर नागरिक उखाड्याने हैराण झाले होते पावसामुळे सुखद गारव्यामुळे उखाड्यापासुन दिलासा मिळत आहे.गडगडाट आणि कडकडाट प्रचंड आहे.वाहतूक मंदगतीने चालु असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.या पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.झाडावरचे आंबे खाली पडले असुन विक्रिस आलेल्या आंबे नासन्याची शक्यता आहे यामुळे आंबे व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे ते काळजीत आहेत.ज्यांची बाजरी काढून झाली असेल त्यांची बाजरी भिजण्याची शक्यता असल्यामुळे बाजरी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची लगबग चालु आहे.ऊसाला मात्र हा पाऊस फायद्याचा आहे.तळेगाव दाभाडे गावभाग आणि स्टेशन परिसरात भरपूर खड्डे आहेत.अनेक खड्डे बुजविले नाहीत त्यामध्ये पाणी साचल्यामुळे गड्डयांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांना नेहमी प्रमाणे धोकादायक झाले आहे.डांबरीकरण न झाल्यामुळे रोडराडा झाला आहे.डांबरीकरणाचे २-३ महीन्यांपुर्वी उदघाटन झाले परंतु काम न झाल्यामुळे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.