प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प.आनंदराव नारायण काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेज इंदोरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अतिशय दिमाखात संपन्न
इंदोरी :
प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प.आनंदराव नारायण काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेज इंदोरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अतिशय दिमाखात संपन्न झाला ढोल लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले.संमेलनाचे ध्वजारोहण सरपंच शशिकांत शिंदे यांचे हस्ते करण्यात आले .प्रसंगी नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे अध्यक्षस्थानी होते. त्या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. विजय नवले होते.
प्रमुख पाहुणे मा. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच संदीप ढोरे,क्रषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिलीप ढोरे, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, संस्थेचे जेष्ठ संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा , रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष मिलिंद शेलार, साप्ताहिक अंबरचे उपसंपादक अतुल पवार, अजय पाटील, संदीप मगर, विनोद टकले, अभिषेक इंगळे किर्ती इंगळे, सुनील भोंगाडे,प्रशांत भागवत , दिनेश चव्हाण,बबन ढोरे, दत्तात्रय ढोरे, संस्थेतील विविध शाळांचे मुख्याध्यापक,प्राचार्य रेवाप्पा शितोळे, पर्यवेक्षिका सौ कमल ढमढेरे, शिक्षक प्रतिनिधी सौ स्वाती गाडे उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली .ईशस्ववन , स्वागतगीत व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. प्रशालेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संतोष खांडगे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कला , रांगोळी , विज्ञान दालनांचे उद्घाटन, हस्तलिखित प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रेवाप्पा शितोळे यांनी केले. प्रमुख वक्ते प्रा विजय नवले यांनी रसाळ वाणीने विद्यार्थ्यांची मने जिंकुन घेतली व विद्यार्थ्यांना आदर्श भारत घडविण्याचे आवाहन केले.अध्यक्ष पदावरून बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी उत्तम कार्यक्रमा बद्द्ल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याचे आवाहन केले. बौद्धिक,शारिरीक विभागातील व रोख स्वरुपातील बक्षिस वितरण पाहुण्यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी विद्यार्थांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता . महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ व लोटस काॅम्पुटर यांच्या कडून विद्यालयातील ज्योती पिंजण व रूपेश शिंदे यांचा गुणवंत शिक्षक व शुभम कांबळे यांना गुणवंत सेवक पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांचे हस्ते देण्यात आला. अभिषेक इंगळे यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी ४०००० रुपयेचा धनादेश दिला . प्रमुख वक्ते प्रा .विजय नवले यांचा परिचय लक्ष्मण मखर त्यांनी केला . सुत्रसंचलन शितल शेटे , श्वैता मोहिते व मोहिनी ढोरे यांनी केले . संमेलन प्रमुख अश्विनी शेलार यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संमेलन प्रमुख प्रा .सतिश मिंडे , शुभम कांबळे सर्व विभागातील प्रमुख , त्यांचे सहकारी शिक्षक , आॅफिस मधील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.