तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींचा शपथविधी समारंभ पार पडला.
तळेगाव दाभाडे:
तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित जी एन एम नर्सिंग स्कूलच्या प्रथम वर्ष विद्यार्थिनींचा शपथविधी आणि लाईटनिंग दि लॅम्प हा प्रसन्न पवित्र शानदार समारंभ मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटल च्या रिक्रेशन हॉलमध्ये संपन्न झाला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष गणेश खांडगे यांनी 1925 या वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या तळेगाव जनरल हॉस्पिटल स्थापनेपासून चा प्रगतीचा आढावा आपल्या ओघावत्या भाषेत व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे चेअरमन शैलेश भाई शहा यांनी शारीरिक व्यंग असूनही 100% मार्केटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना मोटिवेट केले. प्रमुख वक्ते डॉक्टर सुरेश रे यांनी आदर्श परिचारिकेचा आकृतीबंधच आपल्या मनोगत व्यक्त केला. सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले उच्च विद्या विभूषित इनोव्हेटिव्ह अँड मोटिवेटिव्ह स्पीकर नारायणजी चांडक यांनी तीनच मिनिटात परिवर्तनशीलता सृजनशीलता आणि संवादशीलता याचे महत्व प्रात्यक्षिकाद्वारे सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. आदिवासींसाठी कृतीशील असलेले सुधीर अलकारी यांनी आपल्या शुभेच्छा शेरोशायरीतून व्यक्त केल्या. या अत्यंत पवित्र समारंभाचा समारोप करताना डॉक्टर शालिग्राम भंडारींनी आपल्या पन्नास वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायातील सत्य घटना विदीत करून किन ऑब्झर्वेशन क्रिटिकल थिंकिंग अँड लॉजिकल रीजनिंग इस द बेस्ट ऑफ सक्सेस हा विद्यार्थ्यांना कानमंत्रच दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या केदारे आणि श्रुती चव्हाण या विद्यार्थ्यांनी केले. अनिकेत साळवे आणि यश पारेख यांनी योग्य संगीत योग्य वेळी सादर करून समारंभ चैतन्य निर्माण केले. अत्यंत अभ्यासू क्रियाशील प्राचार्य मोनालिसा पारगे आणि त्यांना सर्वार्थाने साथ देणाऱ्या उपप्राचार्य ख्रिस्टीना रणभिसे या उभयतांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून शपथविधी समारंभ उत्कृष्टपणे पार पाडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युक्ता नलावडे यांनी केले .