*रुफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे लोकार्पण*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथूभाऊ बाबुराव भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्रमांक- २ आणि थोर जिजामाता प्राथमिक शाळा क्रमांक – ५ या शाळेच्या इमारतीवर रुफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला गेला आहे. या प्रकल्पामुळे भूजलातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. यावेळी पर्जन्य रेनवॉटर हार्वेस्टिंग कन्सल्टन्सीचे संचालक सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी भावी पिढीसाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे हि काळाची नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले.
सदर प्रकल्पासाठी कर्नल शशिकांत दळवी यांच्या पुढाकाराने एका शिक्षण प्रेमी देणगीदाराने दिलेल्या आर्थिक देणगीतून राष्ट्रधर्म फाऊंडेशनच्या सौजन्याने मॅप्स इंडस्ट्रीज (इं) प्रा ली पुणे, या कंपनीने हा प्रकल्प शाळेच्या इमारतीवर स्थापित केला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्य अधिकारी ममता राठोड याच्या हस्ते व कर्नल शशिकांत दळवी नगरसेवक अरुण माने यांचे उपस्थितीत या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा १६ डिसेंबर २०२४ रोजी शाळेत संपन्न झाला. कर्नल शशिकांत दळवी यांनी पाणी संवर्धन व रुफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत विध्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. उपमुख्य अधिकारी ममता राठोड यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पामुळे शाळेच्या छतावरील ६२५० स्केअर फुट क्षेत्रफळावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी ८,१२,५०० लिटर पाण्याचे बोअरवेल मार्गे भूगर्भात पुनर्भरण होणार आहे.
सदर लोकार्पण सोहळ्यास माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी पोळ, नगरसेवक अरुण माने, जयंतराव कदम, संतोष परदेशी, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, राष्ट्रधर्म फाऊंडेशनचे विनेंदर सिंग, मॅप्स इंडस्ट्रीजचे सचिन धनशेट्टी, राजू तेली उपस्थित होते.
नगरसेवक अरुण माने यांनी आभार प्रदर्शन केले.