*अॅड पु. वा. परांजपे विद्यामंदिरामध्ये विद्यार्थी स्वच्छतागृह उद्घाटन समारंभ संपन्न*
तळेगाव दाभाडे :
दिनांक ३०/६/२०२५ रोजी पॉस्को कंपनी व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी पॉस्को कंपनीचे प्रतिनिधी अमोल बुडखुले HOD Production , सुरज म्हस्के HOD MSD, नेहा वाकचौरे Team Leader HR , रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष कमलेश कारले, उपाध्यक्ष श्रीशैल मेंथे, सेक्रेटरी प्रमोद दाभाडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे , संदिप पानसरे, पांडुरंग पोटे, रेखा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्याथ्यांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन वर्गखोल्यांची गरज शाळेला आहे त्यासाठी कंपनी CSR व रोटरी क्लबचे सहकार्य लाभावे अशी आशा व्यक्त केली .
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ,भौतिक सुविधा उपलब्ध करुन देऊन देशाच्या भविष्याच्या विकासकार्यात हातभार लावणे हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सामाजिक संस्था, माजी विद्यार्थी व विविध कंपन्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून होत आहे. असे मत यादवेंद्र खळदे यांनी व्यक्त केले. उच्चशिक्षित होऊन कुटूंबाच्या, शाळेच्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करा असा मोलाचा संदेश शाळेचे माजी विद्यार्थी अमोल बुडखुले यांनी विद्यार्थ्यांना दिला. नेहा वाकचौरे बोलताना म्हणाल्या विद्यार्थी हा शाळेचा प्राण आहेत, भारताचे भविष्य शाळेत विकसित होत असते. अशी ज्ञानमंदिरे ही सुसज्ज हवीत. मुख्याध्यापकांच्या आवाहनाचा लवकरच विचार करुन शाळेची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल असे आश्वासन दिले. कमलेश कारले यांनी शाळेने संपादन केलेल्या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा विकासकार्यात हातभार लावण्याचे आश्वासन दिले. मान्यवरांचे आभार शाळेच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व सुवर्णा काळडोके यानी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले