जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणे, कामशेत, ठाकरवाडी,मावळ,पुणे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन संपन्न

SHARE NOW

मावळ :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणे मावळ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे चँलेंजर्स चे अध्यक्ष- रो.वासुदेव लखिमले, संस्थापक अध्यक्ष ज्योती राजिवडे उपाध्यक्ष-रो.सुनिल जाधव,अँडमिन-रो.गणेश शेडगे, खजिनदार-रो.संतोष नाणेकर, डायरेक्टर-प्रथमेश बनसोडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राध्यापक श्री.उत्तम देसाई सर यांनी मांडले.प्रमुख उपस्थित मान्यवरांनी खुप छान आप-आपली मनोगते अगदी थोडक्या शब्दांत मांडली.

मुलांना गिफ्ट स्वरुपात छोटीशी भेट व खाऊ वाटप करण्यात आला.

मान्यवरांचा मान-सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष-रो.सुनिल जाधव मानले.

Advertisement

कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेचे प्राध्यापक-श्री.उत्तम देसाई सर व त्यांच्या स्टाफ, नाणे नगरीतील प्रतिष्ठित मान्यवर, अंगणवाडी सेविका, शाळेतील मुल,पालक वर्ग व रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे चँलेंजर्स चे डायस व बोर्ड ऑफ डायरेक्टर उपस्थित होते.

लवकरच  रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे चँलेंजर्स कडुन क्लब चे अध्यक्ष-रो.वासुदेव लखिमले व सर्व डायस आणी बोर्ड ऑफ डायरेक्टर शाळेचे कलरींगचे (पेंटिंग) काम पुर्ण करुन देणार आहे.

जमेल तेवढी शाळेला मदत देण्याचे आश्वासन रोटरी चँलेंजर्स क्लब कडुन शाळेला देण्यात आले.

अशा पध्दतीने खुप छान पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page