*तळेगाव येथे इंजिनियर आणि आर्किटेक्ट डे साजरा*

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आयडीसी यांच्या वतीने व्होकेशनल डे निमित्ताने इंजिनियर व आर्किटेक्ट डे नुकताच साजरा करण्यात आला.रोटरी क्लब मधील अभियंते आणि आर्किटेक्ट हे नेहमीच नवीन विचार तंत्रज्ञान आणि समाजसेवेची भावना घेऊन येतात. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आपण रोटरीच्या विविध प्रकल्पांमध्ये यशस्वी होऊ शकलो आहोत असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.

यावेळी आपल्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आयडीसी परिवारातील सर्व आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

इंजिनीयर आणि आर्किटेक्ट या दोन्ही व्यवसायांनी आपल्या समाजात आपल्या देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याचे प्रत्येक क्षेत्र अधिक सुरक्षित सुंदर आणि सुव्यवस्थित बनले आहे त्यांच्या कल्पकतेतून उभ्या राहणाऱ्या इमारती पूल रस्ते आणि अनेक प्रकल्प केवळ दैनंदिन गरजा भागवत नाही तर भविष्याच्या दिशेने उडी मारण्यासाठी आधार ठरतात.. असे मत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतातून व्यक्त केले.

याप्रसंगी प्रकल्प प्रमुख सुनील रहाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. फ्रान्सिस रोझारिओ,दशरथ जांभुळकर,सुनील खोल्लम,युवराज पोटे,सचिन कोळवणकर,

बाळासाहेब शिंदे,लक्ष्मण मखर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सुमती निलवे यांनी केले. तर आभार राजेंद्र पंडित यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page