वाल्हेकरवाडीत नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
वाल्हेकरवाडी :
वाल्हेकरवाडीत नवरात्र महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात ११ लाख ११हजार १११ रुपयाचे पारितोषिक हजारो लोकांच्या उपस्थितीत वाटण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी येथे दिनांक २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान भव्य नवरात्र महोत्सव व रास दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. स्पर्धेतील विजेत्यांना ३ ई – बाईक तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे व हजारो स्पर्धकांना साडी व गिफ्ट बॉक्स आणि लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्रीमती जयश्री राजेंद्र खैरे आणि समस्थ वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर आयोजक मा.श्री. भरत वाल्हेकर व सुप्रिया भरत वाल्हेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. उपस्थित प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी व स्पर्धकांनी भरत वाल्हेकर यांचा सत्कार करण्याची मागणी केली असता भरत वाल्हेकर यांनी निवडणुकीनंतर माझा सत्कार करावा अशी साद सर्वांना घातली. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणात लोकांना उद्देशून म्हणाले की मी सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहे. यावेळी उपस्थितीत नागरिकानंमध्ये टाळ्यांच्या गजर झाला. भरत वाल्हेकर व सुप्रिया वाल्हेकर यांनी गेल्या १२ दिवसात या कार्यक्रमाचे उत्कृष्ट अयोजन करून प्रभाग क्रमांक १७ मधील महिलांना व तरुणांना नवरात्र महोत्सवानिमित्त भव्य रास दांडिया खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले होते. एकंदरीत सदर नवरात्र उत्सव व बक्षीस वितरण समारंभात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचे बिबुल वाजल्याचे जाणवले.प्रभाग क्रमांक १७ चा विचार केला असता १२ दिवसाच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये भरत वाल्हेकर आणि सुप्रिया वाल्हेकर यांच्या विजयाच्या चर्चा जोमात रंगल्या आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना गुलाब वाल्हेकर, वैशाली सुनील वाल्हेकर, आकाश राजेंद्र खैरे, शुभम सुनील वाल्हेकर, यश गुलाब वाल्हेकर, चंद्रकांत दत्तोबा चिंचवडे, गुलाब शंकर वाल्हेकर, प्रजाक्ता हेमंत वाल्हेकर आणि वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या विशेष योगदान मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. एकूणच वाल्हेकरवाडीतील नवरात्र महोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा न राहता एकात्मता उत्साह आणि जनतेच्या विश्वासाचा प्रतीक ठरला आहे. हा नवरात्र महोत्सव केवळ उत्साह नाही तर आपली ग्राम एकता आणि परंपरेचे प्रतीक आहे.. महिलांची प्रतिक्रिया विचारली असता गेल्या १२ दिवसात या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या भरत वाल्हेकर व सुप्रिया वाल्हेकर यांना येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत पाठीशी उभे राहण्याचे व विजय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गतवर्षी प्रमाणेयाही वर्षी हजारोंचा संख्येने उपस्थित दांडिया स्पर्धकांचा व नागरिकांचा उत्साह व आनंद पाहून इथून पुढे अशाच नवरात्र महोत्सवाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करू असे आश्वासन भरत वाल्हेकर यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील ग्रामस्थांना, दांडिया स्पर्धकांना, नागरिकांना दिले.
गेल्या 12 दिवस संपूर्ण वाल्हेकरवाडी सह अनेक प्रभागांमध्ये या कार्याक्रमाची चर्चा जोमात सुरू आहे. या कार्यक्रमात नागरिक कुटुंबा सारखे एकत्र आल्याचे पाहण्यात आले.
प्रभाग क्रमांक १७ मधील प्रत्येक महिला युवक आणि लहान मुलं सगळ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमात कोणतीही राजकीय रंगत नव्हती पण जनतेने प्रेमानेच या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला






