पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळ दोन कारची धडक, एकाचा मृत्यू
उर्से: पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याच्या पुढे शनिवार दिनांक १४जून २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नो एंट्री तुन आलेल्या एका कारने दुसऱ्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. विशाल पुंडलिक बडीगिर (वय. ३९ राहणार मोहन नगर चिंचवड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गमनाराम रणछोडदास चौधरी(वय.३२ राहणार पुनावळे) यांनी रविवार दिनांक १५जुन २०२५ रोजी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आरोपी एमजी हेक्टर कार भरधाव वेगात विरुद्ध दिशेने चालवून फिर्यादी चौधरी यांच्या सफारी कारला धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून आरोपी चालक बडीगिर याचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.