गोल्डन रोटरी चा पदग्रहण समारंभ दिमाखात साजरा.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

रोटरी क्लब ऑफ निगडी च्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा चार्टर प्रदान व प्रथम पदग्रहण सोहळा सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाघदार सोहळ्यात संपन्न झाला.

सर्व सदस्यांनी एकसारखे जॅकेट घातल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली होती.

3131 चे प्रांतपाल शितल शहा व रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष सुहास ढमाले यांच्या हस्ते चार्टर प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी प्रांतपाल शितल शहा सहप्रांतपाल अशोक शिंदे प्रा डॉ मिलिंद भोई सहप्रांतपाल दीपक फल्ले निमंत्रक किरण ओसवाल हे व्यासपीठावर उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ गोल्डनच्या चार्टर अध्यक्षपदी संतोष परदेशी उपाध्यक्षपदी प्रशांत ताये सचिव पदी प्रदीप टेकवडे यांची निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ गोल्डन च्या सर्व चार्टर सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रांतपाल यांनी शुभेच्छा दिल्या रोटरी गोल्डनचे सदस्य तळेगाव शहरात रोटरीचे नाव उज्वल करतील यात कोणतीही शंका नाही असे प्रतिपादन शीतल शहा यांनी केले.

स्वागतासाठी CRPF चे बँड पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.आयपीएस वैभवजी निंबाळकर यांनी सर्व संचालक मंडळ व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डिस्ट्रिक्ट 3131चे अनेक क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा पुरस्कार विजेते प्रा डॉ मिलिंद भोई यांचा गोल्डन एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.

Advertisement

आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर भोई यांनी ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो या मानव धर्मामधूनच मी कार्य करत असतो आणि तुमच्यासारख्यांनी दिलेल्या पुरस्कारामुळे मुळे आणखीन ऊर्जा मिळते.

कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी तळेगावचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे,राजेंद्र पोळ,माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, गिरीश खेर,माजी नगरसेवक इंद्रकुमार ओसवाल,प्रकाश ओसवाल,अरुण माने, श्रीराम कुबेर शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विनायक अभ्यंकर, लक्ष्मण माने,राकेश ओसवाल, खंडूजी टकले,विनोद टकले,संजय शिंदे,जयवंत कदम,सुरेश झेंड,माजी नगरसेवक भूषण मुथा,विलास जाधव,प्रमोद दाभाडे,रशीदभाई सिकिलकर,शहाणूर मुलाणी, विनोद राठोड, सुशीला मंगल कार्यालयाचे मालक नागेश परदेशी,विनोद परदेशी,पांडुरंग करंडे,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे,रोटरी एमआयडीसी,रोटरी मावळ,रोटरॅक्ट क्लब,गोल्डन रनिंग ग्रुप,भोई समाज,धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था,फ्रेंड्स क्लब,तेली समाज मारुती मंदिराचे विश्वस्त यासह अनेक संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते.

यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले व शशांक फडके यांनी नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे नियोजन निखिल महापात्र, प्रदीप मुंगसे,राकेश गरुड,बसप्पा भंडारी,दिनेश चिखले,प्रसाद पादिर,सौरभ मेहता यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनाया केसकर प्रास्ताविक दीपक फल्ले यांनी केले प्रदीप टेकवडे यांनी सेक्रेटरी रिपोर्टचे वाचन केले आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page