*विठू नामाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न….*
पवन मावळ :
पवन मावळातील मळवंडी ढोरे शाळेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने व आनंदात संपन्न झाला. सरोजा अंबुलगे व पूजा राऊत या महिला भगिनींच्या हस्ते पालखी सोहळ्याचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.
ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, तसेच पावली चालती पंढरीची वाट, चंद्रभागेच्या तिरी, देव माझा माझा इत्यादी भजने अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले.
ग्रामस्थ महिला भगिनी तसेच विद्यार्थिनींनी फुगड्या व फेर धरून दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.
भक्तिमय वातावरणामध्ये मळवंडी गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
मुख्याध्यापक राजू भेगडे व शिक्षक धिरजकुमार जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.