सर सेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र.४ येथे आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
सर सेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र.४ येथे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. बाल वारकरी भक्ती रसात दंग झाले होते. हरिनामाचा गजर व दिंडी सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत हा सुख सोहळा शाळा चौक व माळ आळीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचला. मंदिरात या बालवारकऱ्यांनी भजन ,अभंग , फुगड्या यांचा मनमुराद आनंद लुटला. पालखी सोहळ्याचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोने, वैशाली साबळे, ताहेरा बासडे, निकिता शितोळे ,सोनाली घाटे व प्राची लोमटे यांनी केले .तळेगाव दाभाडे नगरीतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दाभाडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थिनींना प्रसाद वाटला.