तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळा प्रशासन,पोलीस व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक#
तळेगाव दाभाडे : विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगरपरिषद, नगरपरिषद शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन व तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग तसेच पंचायत समिती वडगाव मावळ आरोग्य विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थी वाहतूक, सुरक्षितता व आरोग्य याबाबत तळेगाव दाभाडे कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व ज्यु. कॉलेज यांचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांची बैठक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली. सदर सभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, श्री. कन्हैया थोरात, तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक, तळेगाव दाभाडे वाहतूक श्री. गणेश लोंढे, वरिष्ठ पोलिस उपनिरिक्षक, तळेगाव दाभाडे वाहतूक शाखा प्रमुख, तालुका आरोग्या विस्तार अधिकारी श्री. ठोंबरे व प्रशासन अधिकारी श्रीमती. शिल्पा रोडगे हे उपस्थित होते.
सदर सभेमध्ये १३ मे २०२५ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सुचना व मार्गदर्शन करण्यावत आले.
१. लैंगित गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ मधील तरतूदींची अंमलबजावणी करणे.
२. शाळेतील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबत.
३. शाळा व परिसरात CCTV बसविणे बाबत.
४. कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणी प्राधान्याने करुन घेणे बाबत.
५. विद्यार्थी वाहतुकीबाबत सुरक्षेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत.
६. विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत.
७. विद्यार्थी आरोग्याबाबत.
विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी शाळांच्या वेळांमुळे शहरातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने लवकरच पोलिस विभागाच्या मदतीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांच्या चांगल्या वाईट सवयींबाबत काय उपाययोजना करता येईल या बाबत मार्गदर्शन केले.
बैठकीचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. केशव चिमटे यांनी केले.