आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उदघाटन.

SHARE NOW

कात्रज :

पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उदघाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशीला अनावरण करून ( दि २३ ) करण्यात आले.यावेळी पोलीस सह.आयुक्त रंजनकुमार शर्मा,अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे,पोलीस उप आयुक्त झोन २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस स्टेशनची निर्मिती कारण्यात आली होती.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे विभाजन करून आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात त्यानंतर आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे ( दि २३ ) उदघाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले नागरिकांच्या पोलिसांकडून अपेक्षा जास्त वाढल्याने आमचीही जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील त्याला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे हद्दीमध्ये सुरू असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही त्यावर कली कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण मोहीम प्रत्येक शनिवारी सुरू असून येत्या आठवड्यावर ही मोहीम सुरू राहणार असून जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. गावगुंड जर दहशत निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात येईल मकोका अंतर्गत देखील कारवाया करण्यात येतील.

Advertisement

नवीन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

या वेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी आभार मानले तर अँड दिलीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

*या उद्घाटन प्रसंगी मा.सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक श्री. गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, मोहन कळमकर, रतिकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नितीराज थोरात, सुरेश शिंदे, आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.*


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page