अजिवली जवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशा भगवान भिकोले यांची बिनविरोध निवड.
पवनानगर : अजिवली जवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशा भगवान भिकोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच मनिषा जाधव यांनी ठरलेल्या कालावधीत राजीनामा दिला होता त्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली होती यामध्ये भिकोले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी सचिन कोकाटे व तलाठी मनिषा पाखरे यांनी काम पाहिले.
यावेळी आधिकरी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले, माजी उपसरपंच संतोष भिकोले,आंबवणे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.सीताताई कराळे, भाऊसाहेब कडू, मच्छिंद्र कराळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन लायगुडे, अमोल गोणते, रूपाली लायगुडे,दशरथ शिर्के, विनायक केदारी, चंद्रकांत गोणते, नितीन गोणते, नवनाथ राऊत, राजाभाऊ केंडे, बंडू केंडे, सुभाष शिंदे, शत्रुघन धनवे, नवनाथ कुढले, वसंत म्हसकर, संतोष जाधव,रमेश भिवडे, पोलीस पाटील गणेश उंबरकर, सरपंच नारायण बोडके, सरपंच संभाजी कोंडे, सरपंच सनी कडू ,सरपंच जयवंत घारे, गणेश सावंत,विकास गोणते, हनुमंत गिरंजे, सुनिल सुतार, रमेश गोणते आदी उपस्थित होते.
निवडीनंतर भिकोले म्हणाल्या की, उर्वरित कालावधीत सर्वांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त निधी आणून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील.