सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब राजाराम दाभाडे व उपाध्यक्षपदी प्रमोद गायकवाड यांची बिनविरोध निवड
मावळ :
सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब राजाराम दाभाडे व उपाध्यक्षपदी प्रमोद गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेचे चेअरमन सुनील दाभाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बाळासाहेब राजाराम दाभाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने व उपाध्यक्ष बाळासाहेब दाभाडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रमोद गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड सहाय्यक निबंधक अधिकारी राकेश निखारे यांनी जाहीर केली. या प्रसंगी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक बजरंग जाधव ,रमेश दाभाडे, रमेश गिरी, गोपाळ गायखे , सविता दाभाडे, सारिका दाभाडे व व्यवस्थापिका रुपाली दाभाडे हे उपस्थित होते . याप्रसंगी गोरख तात्या दाभाडे ,अशोक दाभाडे ,बाळासाहेब दाभाडे, चंद्रकांत आल्हाट, माजी सरपंच गणेश दाभाडे ,दिलीप दाभाडे लक्ष्मण मखर, रामभाऊ राठोड रोहिदास मराठे, दत्तात्रय लबडे, रोहिदास म्हसे ,सचिन दाभाडे पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते .पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री बाळासाहेब राजाराम दाभाडे यांनी बोलताना सांगितले की पतसंस्थेचे संस्थापक सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाला बरोबर घेऊन पतसंस्थेच्या विकासासाठी सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सांगितले.