देहूरोड धम्मभूमीवर उसळला भिमभक्तांचा महासागर

देहूरोड :

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा ७० वा वर्धापन बुधवारी ( ता.२५ ) विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाख्खो बौद्ध बांधव,डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांनी भगवान गौतम बुद्ध आणि अस्थीस्तुपाचे दर्शन घेतले. वाहतूक नियंत्रक पोलीस आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

.चैत्यभूमी,धम्मभूमी आणि दीक्षाभूमी असा त्रिवेणी संगम असलेल्या देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या बुद्ध विहारामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते २५ डिसेंबर १९५४ मध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.ऐतिहासिक धम्मभूमीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भीम अनुयांयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपास मेणबत्त्या प्रज्वलित करून व पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले .पुस्तके, कॅलेंडर,फोटो, स्टेशनरी,कटलीरी,कपडे,खेळण्याच्या थाटलेल्या दुकानांनी धम्मभूमीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.धम्मभूमीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील उपस्थितीत भीमअनुयायीनी फुलून गेले होते.

बुद्धविहार कृती समिती समितीच्या वतीने सकाळी ८ वाज. विदर्भीय भीम सैनिकांचे स्वागत करून सामुदायिक वंदना घेण्यात आली.सकाळी साडे आठ वाजता संघपाल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली महाधम्म रॅली झाली.पावणे दहा वाजता पंचशील ध्वजारोहण,साडेदहा वाजता राष्ट्रीय धर्मगुरू भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते,धम्मशास्त्री असित गांगुर्डे व बौद्ध नेते प्रबुद्ध साठे यांच्या अध्यक्षतेत संघपाल शिरसाठ यांच्या उपस्थित महाबुद्ध वंदना घेण्यात आली.बसपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.अनिल डोंगरे यांच्या हस्ते,डॉ.हुलगेश चलवादी,किरण आल्हाट,प्रा.चंद्रकांत ओव्हाळ आणि आनंदराव ओव्हाळ यांच्या उपस्थितीत आली.दुपारी १ वाजता वर्धापनदिन समारंभाचे उदघाटन झाले.

Advertisement

 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पुरस्काराचे मानकरी

विश्वनाथ मोरवळे ( प्रबुद्धरत्न ) ,ऍड.धनिराम वंजारी (न्यायरत्न),राधिका रामटेके ( भीमरत्न ),अक्षय बबलाद (वृत्तरत्न ),डॉ.जयदेव गायकवाड , (प्रबुद्ध साहित्यरत्न ),रमेश कांबळे (क्रांतिरत्न ),सुरेशदादा मोगल (धम्मरत्न ),लक्ष्मण साळवे व राहुल जाधव ( भीमरत्न ),बाळासाहेब गायकवाड ( उद्योगरत्न ) आणि प्राचार्य सुनील वाकेकर ( क्रांतिरत्न )

 

भारतीय महसूल सेवेचे आयुक्त विकास सूर्यवंशी,समाजसेविका अनिता सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत,ऐतिहासिक धम्मभूमीचे अनुवर्तक आणि उद्योजक विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक म्हस्के आणि प्रवक्ते डॉ.किर्तीपाल गायकवाड यांनी केले.

दुपारी अडीच वाजता भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संविधान जनजागृती परिषदेचे उदघाटन पुणे बार्टीचे महासंचालक डॉ.सुनील वारे यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये अनेक नामवंत व्याख्यात्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर शीतल यशोधरा व हृदयमानव अशोक यांनी संविधानाचे भारुड सादर केले.सायंकाळी ५:३० वाजता धम्मभूमी फेस्टिवल विजेता पुरस्कार वितरण समारंभ व मनोगत सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला.रात्री साडे आठ वाजता विदर्भीय भीमशाहिरांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.व्हिक्टोरिया डान्स अकॅडमी – निनाद बापासाहेब गायकवाड यांचे नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page