*राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग शाळांमध्ये फळवाटपाचा उपक्रम*
तळेगाव दाभाडे :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एस.ई.सी. सेंटर नायगाव तसेच तळेगाव दाभाडे येथील करुणांजली मतिमंद मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केक कापून वाढदिवस साजरा करत फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्षा ज्योती राजीवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्षा नीता ढवान पाटील,Adv. समृद्धी ढवान पाटील, तळेगाव शहर अध्यक्षा मोहिनी काळे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा इंगळे, छाया साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजिवडे तसेच दोन्ही शाळांचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्षा नीताताई ढवान पाटील म्हणाल्या की, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, मी मदतीस तयार आहे.”
तसेच मावळ तालुका महिला अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी दिव्यांग मुलांना UDID कार्ड व शासकीय लाभ संदर्भात अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदर उपक्रम मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सामाजिक उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले






