*तळेगाव येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी च्या वतीने डॉक्टर डे आणि सी ए डे चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, अध्यक्ष मिलिंद शेलार, सचिव राजेंद्र पंडित, प्रकल्प प्रमुख युवराज बडे, सुदाम दाभाडे, ॲड. मच्छिंद्र घोजगे, सचिन कोळवणकर, सुनील खोल्लम, पांडुरंग पोटे, लक्ष्मण मखर, राहुल खळदे, सुवर्णा मते, संदीप मगर, सुषमा गराडे, दशरथ जांभुळकर, योगेश शिंदे,नितीन नागरे, विजय इंगळे, महादेव पाटील, सुनील रहाते,ज्योती नवघणे आदी उपस्थित होते.
रक्तदान हा पवित्र आणि मानवतेच्या सेवेचा महान मार्ग आहे. आपल्या अवतीभवती अनेक लोक आहेत ज्यांना तातडीने रक्ताची गरज पडते. अपघात ग्रस्त गंभीर आजारांनीग्रस्त रुग्ण शस्त्रक्रिया होणारे रुग्ण आणि बरेचसे लहान मुलं जे जीवनासाठी रक्तावर अवलंबून आहे त्यांच्या जीवनात अशा आणि नव संजीवनी आणण्याची संधी आपल्या हातून घडत आहे आणि हे घडविण्याचे काम रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून होत असल्याचे प्रास्ताविकात नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी सांगितले.
या विज्ञानाच्या युगात कोणालाही मशीनद्वारे रक्त तयार करायचे तंत्रज्ञान अवगत झालेले नाही, रक्तदान ही काळाची गरज असून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. माणसाला फक्त माणसाचेच रक्त चालत असल्याने माणसाने माणुसकी दाखवत रक्तदान केले पाहिजे, असे मार्गदर्शन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड बँक च्या सहकार्याने करण्यात येत असणाऱ्या या रक्तदान शिबिरात ९७ जणांनी रक्तदान केले. यात तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. या सर्वांना पाच लाखाच्या मोफत अपघात विमा रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी मार्फत देण्यात आला.