*तळेगाव लायन्स क्लबचे भरीव योगदान*
तळेगाव दाभाडे :
सामाजिक कार्यात ५३ वर्षांच्या उज्वल परंपरेतून लायन्स क्लब ऑफ तळेगावने सर्व सहकाऱ्यांच्या योगदानातून पुणे, नाशिक आणि नगर या तीनही जिल्ह्यात २२० क्लबच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची १० पारितोषिके प्राप्त केली आहेत. लायन्स क्लब ऑफ तळेगावचे विद्यमान अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे यांच्या कारकिर्दीतील हे भरीव योगदान प्रशंसनीय आहे.
प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.
बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड अनिकेत काळोखे, प्रेसिडेंट डायमंड अवॉर्ड अनिकेत काळोखे, बेस्ट ऍक्टिव्हिटीज अवॉर्ड, बेस्ट कॉम्प्युटर एज्युकेशन ऍक्टिव्हिटी अवार्ड, प्लॅटिनम कॅबिनेट अवॉर्ड प्लॅटिनम सेक्रेटरी अवॉर्ड प्लॅटिनम ट्रेझर अवॉर्ड डायमंड कॅबिनेट अवॉर्ड डायमंड कॅबिनेट अवॉर्ड शैलेश शहा, सुचित्रा चौधरी, प्रकाश पटेल, प्रशांत शहा, राजश्री शहा आणि बेस्ट परमनंट प्रोजेक्ट अवॉर्ड.
या सन्मानप्राप्त बक्षीस वितरण प्रसंगी सिने अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर, भार्गवी
चिरमुले यांसह प्रांतपाल एमजेएफपीडीजी, प्रेमचंद बाफना, विजय भंडारी, डिस्ट्रिक्टचे सीईओ शाम खंडेलवाल, खजिनदार राजेंद्र गोयल, सचिव अशोक मिस्त्री आणि पीडीजी, झेडसी,यावेळी लायन्स क्लबचे सभासद उपस्थित होते. त्याप्रसंगी मनोरंजनपर उपक्रमात विविध प्रकारचे नृत्य, सिने अभिनेत्यांची मिमिक्री सादर करण्यात आली.