*स्वामी विवेकानंद स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम*
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची एसएससी परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा सलग अकराव्या वर्षीही कायम असुन
अमृता जाधव हिने ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.आदर्श वर्मा याने ९३.६०टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.अक्षद राठोड याने ९१.८०टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे.यावेळी अध्यक्ष संतोष खांडगे,उपाध्यक्ष सचिव दादासाहेब उ-हे,सचिव मिलिंद शेलार,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे,
शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांनी अभिनंदन केले.प्रथम क्रमांक आलेल्या अमृता जाधव हिने सांगितले की संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम वेळोवेळी आयोजित केलेल्या मार्गदर्शक व्याख्यानमाला यामुळे यश मिळाले.