*रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे तळेगाव दाभाडे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना आकांक्षा एज्युकेशन ॲपचे वाटप*
मावळ :
रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 2 व 6 मधील दहावीच्या 145 विद्यार्थ्यांना आकांक्षा एज्युकेशन ॲप चे वाटप करण्यात आले.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा करून देण्यासाठी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.शितल शहा यांनी हा ॲप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा याकरिता डिस्ट्रिक्ट 3131 मधील सर्व क्लबला आवाहन केले आहे. त्यानुसार रो.संतोष परदेसी डिस्ट्रिक्ट डिरेक्टर बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी यांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ मावळने विशेष प्रयत्न केले आहेत.
गेला महिनाभर मावळातील अनेक शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना या ॲपचं वाटप करण्यात आले आहे अशी माहिती क्लबचे अध्यक्ष रो.नितीन दादा घोटकुले यांनी दिली. या ॲपच्या वाटपासाठी रोटीरी मावळ क्लबच्या उपाध्यक्षा रो.रेश्मा फडतरे यांनी शिक्षण मंडळ प्रशासकीय अधिकारी शिल्पा रोडगे यांच्याशी संपर्क साधून या दोन्ही शाळांमधील दहावीच्या 145 विद्यार्थ्यांना रो. ॲड.दीपक चव्हाण रो.रवींद्र नहाळदे रो.सुनील पवार यांच्या माध्यमातून हे ॲप उपलब्ध करून दिले.
डिस्टिक डिरेक्टर रो.अतुल कामत यांनी विद्यार्थ्यांना या ॲपच्या इन्स्टॉलेशन पासून वापरापर्यंत संपूर्ण माहिती दिली. तळेगावातील हे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असून या ॲपमुळे त्यांच्या शालेय विकासात नक्कीच भर पडेल असा विश्वास शिल्पा रोडगे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे सदस्य सेक्रेटरी रो.पुनम देसाई,रो.मनोज ढमाले,रो.प्रशांत भागवत,रो.राजेंद्र दळवी,रो.निलेश गराडे,रो.स्नेहल घोटकुले अँस नेहा गराडे, शिक्षण मंडळाचे क्लर्क मयुरेश मुळे मुख्याध्यापिका वर्षा थोरात, वसुंधरा माळवदकर सहशिक्षिका मीनल सावंत,दीपमाला गायकवाड आधी पदाधिकारी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी रो.नितीन दादा घोटकुले व शिल्पा रोडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जाधव यांनी केले व आभार अँड रो.दीपक चव्हाण यांनी मानले.