*सत्तेत गेलोय, भाजपात नाही: इद्रिस नायकवडी* राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केले मार्गदर्शन
*वडगाव मावळ:* दि. १० ऑगस्ट:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची होती, आहे आणि कायम राहणार आहे. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालो आहोत; मात्र भाजपात नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी शुक्रवारी (दि.९) वडगाव मावळ येथे केले.
मावळ तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलतर्फे आयोजित पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान अल्पसंख्याक समाजापासून अजितदादा यांनी फारकत घेतली असल्याचे केलेले ‘नरेटिव्ह’ हे समाजात फूट पाडून मतांसाठी केले गेले. त्यामुळे आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभे राहिले याचा विचार अल्पसंख्याकानी केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष समद इनामदार, पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, संदीप आंद्रे, महिला तालुकाध्यक्ष अध्यक्ष दीपाली गराडे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आमीर मुलाणी, महिला सेलच्या अध्यक्ष शबनम खान आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सेलतर्फे नायकवडी आणि इनामदार यांचा सत्कार मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षात तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील पक्ष बांधणीच्या कामकाजाचा आढावा शबनम खान यांनी मांडला.
कार्यक्रमास महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्याचा संदर्भ देत नायकवडी म्हणाले, की आमदार सुनील शेळके यांनी सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेत अजितदादा यांची साथ भक्कमपणे राखल्याने तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला आता खुलेपणाने पुढे आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
मेळाव्यास महिला पदाधिकारी हमिदा बांगी, वहिदा खान, नाजिया शेख यांच्यासह अजिज शिकीलकर, औरंग सादुले, जमीर नालबंद, शाहनूर मुलाणी, मुनीर बैग, रामदास वाडेकर, मुसा शेख, सुलेमान कुरेशी, नाझीम जमादार, निसार शेख, जमीर शेख, मुनव्वर इनामदार, मझहर खान, मझहर सय्यद, हाजी सईद खान, रफिक शेख, अब्दुल मुलाणी, मन्सूर शाह, मदनी मुलानी, शिराज खान, अशरफ नालबंद,शंकर स्वामी, सलाम शेख, सलीम सय्यद, शाहरुख शेख, फय्याज शेख, एजाज जूनेदी, सोनू शेख, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाकीर खलिफा यांनी सूत्रसंचालन केले. अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आमीर बाबा मुलाणी यांनी मानले.