रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात तळेगाव दाभाडे शहर विद्यार्थी आघाडीचे अनोखे आंदोलन : स्व:खर्चाने बुजवले तळेगाव दाभाडे शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे.
तळेगाव दाभाडे दि. 10 ऑगस्ट :
तळेगाव दाभाडे शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे व वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाला वारंवार सांगून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी आघाडी तळेगाव दाभाडे शहर यांच्या पुढाकारातून खांडगे पेट्रोल पंप येथील रस्त्यावर पडलेले खड्डे स्व खर्चाने बुजून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे नियमित कर आकारणी करून सुद्धा मूलभूत नागरी सुविधांपासून तळेगाव दाभाडे मधील नागरिक वंचित आहेत. यांमुळे गांधीगिरी पध्दतीने हे आंदोलन केल्याचे विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात , भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रविंद्र भेगडे , तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष श्री.संतोष भाऊ दाभाडे पाटील , मा.सरचिटणीस श्री.विनायक भाऊ भेगडे ,सरचिटणीस श्री.स्वप्नील भाऊ भेगडे,महिला आघाडी अध्यक्षा सौ. शोभताई परदेशी,सरचिटणीस सौ.शोभाताई भेगडे,श्री.स्वप्नील भाऊ सुतार, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष कु.रोहन भाऊ जाधव त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.