*रोटरी क्लबच्या वतीने रोटरी कम्युनिटी कॉप्सची स्थापना*
तळेगाव दाभाडे :
मावळ पंचायत समिती अंतर्गत शाळांच्या केंद्रप्रमुखांची रोटरी कम्युनिटी कॉप्सची स्थापना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने करण्यात आली. या क्लबचा पदग्रहण समारंभ तळेगाव दाभाडे येथील ॲड.पू.वा.परांजपे विद्यालयात नुकताच संपन्न झाला.
मावळ तालुक्यामध्ये २७४ प्राथमिक शाळा आहे. यापैकी बहुतांश शाळा ह्या ग्रामीण भागात आहेत. याठिकाणी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी तर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असतात यावर्षी शाळा केंद्रप्रमुखाचा आरसीसीची स्थापना केल्यामुळे केंद्रप्रमुखामार्फतच शाळांपर्यंत पोचता येईल. आरसीसी क्लबची स्थापना केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमास जिल्हा आरसीसीचे को.डायरेक्टर सदाशिव काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. आरसीसीचे नूतन अध्यक्ष सुहास धस यांना जिल्हा आर सी सी चे को. डायरेक्टर सदाशिव काळे व रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार तसेच प्रकल्प प्रमुख सचिन कोळवणकर यांच्या हस्ते चार्टर देण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शंकर हदीमणी, अजय पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ जांभुळकर यांनी केले. तर आभार पांडुरंग पोटे यांनी मानले.