*परांजपे विद्यालयात बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे गुरुवर्य कै.अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिरात घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.०९)विद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार, नू.म.वि.प्र. मंडळाचे सदस्य सोनबा गोपाळे , महेश शहा मुख्याध्यापक संजय वंजारे , वासंती काळोखे, भाऊसाहेब आगळमे,केशव चिमटे आदी मुख्याध्यापक,शिक्षक आणि पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी प्रास्ताविकात शाळेचा चढता आलेख आपल्या प्रास्ताविकात मांडला.
नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी संकल्प करा व ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असे सांगितले.
मिलिंद शेलार यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.
सोनबा गोपाळे यांनी बौद्धिक स्पर्धेमध्ये होत गेलेले बदल सांगितले.
महेशभाई शहा यांनी देखील विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी शोभा कदम यांनी पाच हजार रुपयाची देणगी दिली.
पद्य पाठांतर, निबंध व वक्तृत्व अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला रोख रक्कम व प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बौद्धिक स्पर्धा विभाग प्रमुख दीप्ती बारमुख, संपत गोडे, संतोष घरदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले .
सूत्रसंचालन दीप्ती बारमुख यांनी केले पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.