तळेगावमध्ये प्रथमच ओपन हार्ट सर्जरी; मावळवासीयांसाठी हृदयरोग उपचारांचा नवा अध्याय

SHARE NOW

तळेगाव दाभाडे |

माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुबी ऐलकेअरच्या संयुक्त उपक्रमातून हृदयरोग उपचारासाठी बायपास शस्त्रक्रिया (ओपन हार्ट सर्जरी) सेवा मावळ भागातील गरजू रुग्णांसाठी नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

या अंतर्गत गुंतागुंतीच्या ट्रिपल व्हेसल कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजेसने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर यशस्वीपणे कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सी.ए.बी.जी.) शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया रुबी ऐलकेअरचे सी.व्ही.टी.एस. सर्जन डॉ. अजित जेजुरकर आणि भूलतज्ज्ञ डॉ. सुहास पाटील यांनी पार पाडल्या, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी यांनी दिली. विशेष म्हणजे, दोन्ही रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ही सेवा सुरू झाल्याने मावळ भागातील हृदयरोग उपचारपद्धतीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी सांगितले की,

“गंभीर हृदयरोग असलेल्या रुग्णांना आता अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरीसाठी पुणे अथवा अन्य शहरांत जाण्याची गरज राहणार नाही. तळेगावमध्येच अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.”

दरम्यान, हृदयरुग्णांसाठी दिलासादायक घोषणा करत कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास यांनी स्पष्ट केले की, खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च येणाऱ्या या उच्च दर्जाच्या हृदयरोग शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होऊ शकतात.

या नव्या सेवेबद्दल प्राचार्य डॉ. दीपा नायर, समन्वयक डॉ. तुषार खांचणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे व डॉ. वीरेंद्र घैसास यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले असून, गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page